जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- सार्वजनिक श्री गणेशोत्सवात ” लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् ” बाबत जनजागृतीसाठी जळगाव महापालिका आवारात असलेल्या ” सुप्रसिद्ध मानाचा गणपती ” मंडळ येथे ऑर्केस्ट्रा कार्यक्रम झाला. यावेळी भक्तीगीतांचा कार्यक्रम चांगलाच रंगला..यावेळी उपस्थित गणेश भक्त,नागरिक,संगीत प्रेमी यांना ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक ‘ गीत एक ..कला अनेक ..’ या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. ही माहिती प्रसिद्धीप्रमुख व नियोजन समितीचे सदस्य तुषार वाघुळदे यांनी उपस्थित गणेश भक्त – नागरिकांना दिली..यासाठी संकल्पक संघपाल तायडे,अमित माळी, शरद भालेराव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.एका स्टेजवर प्रथमच एक हजार कलावंत असणार असून ५० हजार दिवे प्रज्वलित करून एक नवा इतिहास व विश्व रेकॉर्ड करण्याचा संकल्प असणार आहे.जळगावचे नाव जागतिक पातळीवर जावे हा प्रामाणिक उद्देश आहे.
प्रसिद्ध कलावंत व अँकर तुषार वाघुळदे यांनी जाहीरपणे आवाहन करून ५ नोव्हेंबर ला आवर्जून उपस्थित राहावे असा आग्रह देखील प्रेक्षकांना धरला. गायक प्रिय दिनेशभाई गोयर यांनी या संगीतमय प्रोग्रामची मदार चांगली सांभाळली.
गायिका मिनाक्षी पाटील, सुमितकुमार,चंद्रकांत मानकुळे ,प्रभाकर जाधव, सतीश बातुंगे, ऐश्वर्या शिंपी, शास्त्रीजी यांनी विविध भक्तीगीते सादर करून गणेश भक्तांची वाहवा मिळवली..
मानाचा गणपती च्या आरतीला राज्याचे ग्रामविकास ,पर्यटन आणि युवक कल्याण व क्रीडामंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, प्रसिद्ध उद्योगपती अशोकभाऊ जैन,महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विद्या गायकवाड आदी मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती… त्यांनी भक्तीगीतांचा आनंदही घेतला आणि कलावंतांचा उत्साह वाढविला…हजारो गणेश भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. जळगाव शहर परिसर व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. या संगीतमय कार्यक्रमाचे बहारदार निवेदन पत्रकार,कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे यांनी केले..गायक कलाकारांना प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.