जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील साकेगांव येथील हॉटेल वरुण येथील मॅनेजर यांना ग्राहकानं दारूची बाटली मागितली असता न दिल्याने या गोष्टीचा राग आला..आणि मॅनेजर यांच्या डोक्यात बाटली मारून गंभीर दुखापत केली तसेच हॉटेल मधील दारूच्या बाटल्या आणि इतर सामानाचे नुकसान करीत वीस ते पंचवीस हजार रुपये सोबत घेतले.. हॉटेल वरुण वर राडा करणारे चौदा जणांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आज भुसावळातील मद्यविक्री करणारे व्यवसायिक जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले..त्यात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून आमच्या आस्थापनामध्ये छोट्या-मोठ्या गावगुंडांचा प्रचंड त्रास वाढला आहे. ब्लॅकमेलींग शिवीगाळ तसेच मारहाण करण्याचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. आताच जळगाव- भुसावळ महामार्गावर असलेल्या हॉटेल वरूण परमिट रूमवर बिअर बार मालक यांच्या मुलास व तिथल्या कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली, चाकूचे वार करण्यात आले, तसेच तेथील सीसीटीव्ही डीव्हीआर आदी वस्तू सोबत घेऊन गेले.
अशा प्रकारचे कृत्य गेल्या पंधरा दिवसात अनेक वेळा
जिल्हयात घडले. परंतू आम्ही व्यापारी असल्या कारणाने बऱ्याच प्रसंगी छोटे-मोठे गावगुंडांना सामोरे जातो.
या अशा प्रवृत्ती आणि गुंडामुळे आमच्यासारख्या सामान्य व्यावसायिक धारकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २२ला घडलेली घटना ही निंदनीय आहे. या घटनेनं सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे..असे जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.