Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावमहादेव मंदिरातील दागिने चोरीप्रकरणी ४८ तासांत दोघांना अटक

महादेव मंदिरातील दागिने चोरीप्रकरणी ४८ तासांत दोघांना अटक

एमआयडीसी पोलिसांची जलद कारवाई ; ₹६१,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंदनगर येथील मानेश्वर महादेव मंदिरातील चांदीच्या मुकुटासह इतर दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना केवळ ४८ तासांत अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी अरुण लक्ष्मण शेटे (रा. मुकुंदनगर) हे कुटुंबासह पुण्याला गेल्यामुळे त्यांच्या घरात ठेवलेले मंदिराचे चांदीचे मुकुट व दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. चोरी गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत ₹६१,५०० इतकी होती. या प्रकरणी ११ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेनंतर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पो.उ.नि. चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांच्या पथकास शोधकार्यासाठी नियुक्त केले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघा संशयितांची ओळख पटवली.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४), रा. कासमवाडी, जळगाव, राहुल शेखर रावळकर (वय ३२), रा. जाखनीनगर, कंजरवाडा, जळगाव या आरोपींना अटक केली आहे.चौकशीदरम्यान दोघांनी चोरी स्वीकारली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनि बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

पुढील तपास पोहेकॉ. गिरीश पाटील व पोकॉ. योगेश घुगे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या