Sunday, September 8, 2024
police dakshta logo
Homeअपघातमहामार्गावर चालत्या ट्रकने घेतला पेट.. नशिराबाद जवळ घडलेली घटना..!

महामार्गावर चालत्या ट्रकने घेतला पेट.. नशिराबाद जवळ घडलेली घटना..!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद येथील टाटा शोरूम समोर १० जुलै बुधवार रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास चालत्या ट्रकच्या कॅबिनला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधींनी नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांना दिली. घटनास्थळी नशिराबाद पोलीस स्टेशन कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस तत्काळ हजर झाले.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव ते भुसावळ महामार्गावरील टाटा शोरूमजवळ भुसावळ कडून जळगावकडे जात असलेला ट्रेलरच्या कॅबिनने अचानक पेट घेतला. आग लागताच चालकाने तातडीने ट्रक जागेवरच थांबविला व ट्रकमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र आग लागल्याचे करणं समजू शकले नाही. घटनास्थळावरून पोलीस दक्षता लाईव्हचे प्रतिनिधी जात असताना त्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला तसेच महामार्ग पोलीस यांना संपर्क साधत या अपघाताची माहिती दिली. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी हजर होऊन त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. महामार्ग पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या