Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रातील शाळांचे वेळापत्रक बदलले; आता सकाळी 9 वाजता होणार शाळेला सुरुवात.

महाराष्ट्रातील शाळांचे वेळापत्रक बदलले; आता सकाळी 9 वाजता होणार शाळेला सुरुवात.

मुंबई/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्यातील शाळा नवीन वेळापत्रकानुसार आता सकाळी 7 ऐवजी 9 वाजता सुरू होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 ला सुरुवात होत असून, शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, शाळा सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत चालणार आहे.

शाळेचा पहिला दिवस 16 जूनला सुरू होईल. यावेळी परिपाठ सकाळी 9 वाजता घेतला जाईल. त्यानंतर नियमित लेक्चर, सुट्ट्या आणि शेवटी वंदे मातरम् याप्रमाणे दिनक्रम ठरवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना नवीन वेळेनुसार घरगुती वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. सीबीएसई शाळा 9 जूनपासूनच सुरू झाल्या असून, महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शाळा 16 जूनपासून सुरू होतील. काही भागांमध्ये, विशेषतः विदर्भात, शाळा उशिरा सुरू होणार आहेत.

नवीन शालेय वेळापत्रक (सारांश):

परिपाठ: सकाळी 9:00 – 9:25

लेक्चर 1 ते 3: 9:25 – 11:24

छोटी सुट्टी: 11:25 – 11:35

लेक्चर 4 ते 5: 11:35 – 12:50

मोठी सुट्टी: 12:50 – 1:20

लेक्चर 6 ते 8: 1:30 – 3:55

वंदे मातरम् व सुट्टी: 3:55 – 4:00

सूचना: प्रत्येक शाळेने स्वतःच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याचे स्वातंत्र्य असून, पालक आणि विद्यार्थी यांना शाळेकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीनुसार तयारी करावी.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या