मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाने शेतातील उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतमजुरी विषयक धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कमी मनुष्यबळात काम होईल, मानवविरहित यंत्रांचा वापर होईल आणि कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळेल, अशा विविध योजनांवर शासन काम करीत आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी यांत्रिकीकरणासंबंधी आलेल्या सर्व सूचना सकारात्मकपणे विचारात घेत असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांसाठी कमी मेहनतीत जास्त उत्पादन देणारे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे.
या अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीस कृषी क्षेत्रातील अधिकारी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघटनेस शासनाने आश्वासन दिले की, त्यांच्या सूचनांचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेतले जातील.