Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावमहावितरणच्या लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहात अटक

महावितरणच्या लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहात अटक

पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महावितरणच्या पाचोरा उपविभागातील सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय 38) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 29 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सोलर फिटिंगच्या कामांच्या ‘रिलीज ऑर्डर’साठी एकूण 79 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हा सोलर फिटिंग व्यवसाय करणारा असून त्याने महावितरणकडे तीन नवीन प्रकरणे ऑनलाइन सादर केली होती. या तीन प्रकरणांसाठी प्रति प्रकरण 3 हजार रुपये (एकूण 9 हजार) तसेच यापूर्वीच्या 28 प्रकरणांच्या ‘रिलीज ऑर्डर’साठी 70 हजार रुपये अशी मागणी मोरे याने केली होती.

तक्रारदाराने 11 ऑगस्ट रोजी एसीबी जळगाव येथे तक्रार दाखल केली. पडताळणीत मोरे याने यापैकी काही रक्कम आधीच मिळाल्याचे सांगत उर्वरित 40 हजारांपैकी 20 हजार आणि नवीन तीन प्रकरणांचे 9 हजार असे मिळून 29 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.यानंतर 12 ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पाचोरा येथील महावितरण कार्यालयात सापळा रचून मोरे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या