Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeजळगावमहसूल सेवा पंधरवडा अंतर्गत तरसोद येथे विशेष ग्रामसभा संपन्न

महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत तरसोद येथे विशेष ग्रामसभा संपन्न

तरसोद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येत्या 17 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या महसूल सेवा पंधरवडा निमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी साठी मौजे तरसोद येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तलाठी कार्यालय, मौजे तरसोद येथे झालेल्या या विशेष ग्रामसभेत महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी शासकीय सेवा सुलभ करण्यासाठी शीत शिवार रस्ते, पानंद रस्ते, गाव नकाशावर नसलेले परंतु वहिवाटीचे असलेले सर्व रस्ते यांच्या यादी तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीशी संबंधित शेतरस्त्यांची नोंदणी करून भविष्यातील अडचणी टाळू शकणार आहेत.

विशेष ग्रामसभेत महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत विविध सेवा कार्यक्रमांचे नियोजन सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. त्यात मुख्यत्वे पुढील प्रकारचे कामकाज राबविण्यात येणार आहे:

  • शेत रस्ते मोकळे करणे.
    शेत रस्त्यांना क्रमांक प्रदान करणे.
    जिवंत सातबारा अंतर्गत वारस नोंदी दाखल करणे.
    विविध शासकीय दाखले वितरित करणे.

या कार्यक्रमामुळे महसूल सेवा पंधरवड्याद्वारे शेतकऱ्यांना व नागरिकांना सरकारी सेवा अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळतील, असे सांगितले गेले. विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष सावकारे, ग्राम सदस्य बऱ्हाटे, मडळ अधिकारी मिलिंद देवरे, ग्रामसेवक नरेंद्र साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, महसूल सेवक ज्ञानेश्वर कोळी, गावातील नागरिक, शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामस्थांनी या महत्वपूर्ण उपक्रमाचे स्वागत करत सरकारच्या या उपक्रमातून गावातील सर्व नागरिकांना अनेक सरकारी सेवा सुलभपणे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या