अमळनेर /धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- धुळे येथून कारची सर्व्हिसिंग करून येत असलेल्या माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या वाहनाला नवलनगरजवळ अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.सुदैवाने यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील नव्हते. केवळ चालक होता. तर गाडीतील दोन्ही एअर बॅगा लगेच उघडल्याने चालकही किरकोळ जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्याचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांची गाडी (एमएच-१२, डब्ल्यू ३२३२) ही मंगळवारी धुळे येथे सर्व्हिसींग करण्यासाठी चालक दिनेश धनगर हे घेऊन गेले होते.सायंकाळी पाच वाजता गाडीची सर्व्हिसिंग करून अमळनेरकडे येत असताना नवलनगर जवळील पुलाच्या कठड्याला जोरात ही गाडी ठोकली गेली. यात सुदैवाने डॉ. बी. एस. आबा पाटील नव्हते. तसेच गाडीच्या दोन्ही एअर बॅग उघल्याने चालक धनगरही बालंबाल बचावले.
घटनास्थळी त्यांच्या चाहत्यांनी धाव घेतली आणि मदत केली.अपघात बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.कार मध्ये माजी आमदार श्री.पाटील तर नाही न ? याची माहिती जाणून घेत होते. ते जर कार मध्ये असते तर अनुचित घटना घडली असती. दरम्यान कार चालक धनगर हा बालंबाल बचावले आहेत.