Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादमाळी समाज पंचमंडळातर्फे सावित्रीबाई फुले जयंती व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार

माळी समाज पंचमंडळातर्फे सावित्रीबाई फुले जयंती व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्री.संत सावता माळी पंचमंडळ, खालची आळी, नशिराबाद यांच्या वतीने शिक्षणाच्या पुरस्कर्त्या व देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन नशिराबाद पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व सर्व महिला नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नशिराबाद नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांच्यासह नगरसेवक कोमल नारखेडे, पंकज महाजन, लीना महाजन, मनोज पाटील, शैला व्यवहारे, लालचंद पाटील, सुवर्णा महाजन, चेतन बराटे, जनाबाई रंधे, वासिफ अली सर, शेख मुस्ताक मोहम्मद, इक्बाल शेख, इब्राहिम व भारताबाई धनगर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री मुक्तिदिनाचे औचित्य साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन शामराव माळी होते. याप्रसंगी पंचमंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाजन, उपाध्यक्ष शिवाजी माळी, सचिव निवृत्ती माळी, सहसचिव परेश माळी, सभासद प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन, अरुण माळी, अमोल माळी, शुभम माळी, संदीप माळी, कैलास माळी, बंटी माळी, संजय देशमुख तसेच महिला प्रतिनिधी रुक्मिणी माळी, रेखा माळी, ललिता महाजन, अनिता माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या