Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामलकापूर भ्रातृ मंडळात "लेवा गौरव सोहळा" उत्साहात संपन्न; १५८ विद्यार्थ्यांचा सन्मान

मलकापूर भ्रातृ मंडळात “लेवा गौरव सोहळा” उत्साहात संपन्न; १५८ विद्यार्थ्यांचा सन्मान

मलकापूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लेवा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना समाजसेवा, ऐक्य आणि प्रगतीचे प्रतीक ठरलेल्या लेवा गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम दिनांक ७ सप्टेंबर रोजी मलकापूर येथील भ्रातृ मंडळात उत्साहात पार पडला. लेवा युथ फोरम आणि लेवा शुभमंगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने समाजात नवचैतन्याची अलख जागवली. या गौरव सोहळ्यात एकूण १५८ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यापैकी ११५ विद्यार्थ्यांना ट्रॉफी तर ४३ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या मेहनत, चिकाटी व कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. समाजातील शिक्षण, संस्कार आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी तरुणाईसाठी प्रेरणादायी संदेश दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या रुपात डी. टी. खाचणे (अध्यक्ष, बुलडाणा भ्रातृ मंडळ), दिनकर नारखेडे, सुधीर पाचपांडे, बंडूभाऊ चौधरी, अमित नाफडे, हर्षल भंगाळे, हर्षल जावळे, अतुल महाजन, श्री. बोरळे, डॉ. निशा वराडे, वैशाली फालक, सौ. लीनाताई चौधरी, कीर्ती बोरले यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुत्रसंचालन संजय खर्चे (बुलडाणा) आणि तेजस चौधरी (डोंबिवली) यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाला सुमारे साडेतीनशेहून अधिक समाजबांधवांची उपस्थिती लाभली. ऐक्य, एकता आणि बंधुभावाचे आदर्श मांडणारा हा सोहळा समाजासाठी स्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भ्रातृ मंडळ मलकापूर, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज, डॉ. अरविंद कोलते सर, दीपक टेन्ट हाऊस, अनंत टेकाडे, दिलीप नाफडे, आणि आर. जी. चोपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या