सर्व लोक मावतील असा मोठा मैदान बघून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी एक तारीख जाहीर करणार- मनोज जरांगे पाटील
नवी मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले असून, राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे यांची चर्चा यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सरकारचा शिष्टमंडळातील सदस्य जरांगे सोबत शिष्टाईसाठी आले होते. शिष्टमंडळा सोबत त्यांनी तब्बल तीन तासापर्यंत चर्चा केली.सरकारने दिलेल्या अध्यादेशबाबत जरांगे पाटील हे आपले वकिल आणि मराठा बांधवांना याबाबत महिती सांगत होते. वकिल आणि मराठा बांधव यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांच्याकडून होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असून आझाद मैदानात जाणार नसल्याच त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर पणे सांगितल.
विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मैदान बघून एक तारीख जाहीर करणार
विजयाचा गुलाल उधळण्यासाठी त्यावेळेस सर्व लोक मावतील असा मोठा मैदान बघून एक तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारून मनोज जरांगे पाटील उपोषण सोडतील.
दरम्यान आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सकाळी सात वाजता सभा घेणार असून, या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा, यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील अध्यादेश स्वीकारून हे उपोषण सोडतील.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, राज्य सरकारने सर्व कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांना दिलेले आहेत. त्यांनी आता उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील त्यांना करण्यात आली असून, मनोज जरांगे पाटील यांची मात्र मागणी आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन त्यांचं उपोषण सोडावं. तर आज सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील हे त्यांचं उपोषण सोडतील.