Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्य भरातून आलेले मराठी साहित्यिकांचे औक्षण करून स्वागत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्य भरातून आलेले मराठी साहित्यिकांचे औक्षण करून स्वागत.

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- राज्यस्तरीय ९७ वे मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होत असून या संमेलनामध्ये मराठी भाषेचे साहित्यिक राज्य भरातून आलेले आहेत. मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या साहित्यिकांचे पूर्वसंध्येला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रसंग असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे हे सातत्याने मराठी भाषेबद्दल आग्रही असतात.

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.उषा तांबे, महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक, मसाप पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह मसाप पुणे सौ. सुनीता राजे पवार, कार्यवाह मसाप पुणे, प्रमोद आडकर, महामंडळ सदस्य विनोद कुलकर्णी, कार्यवाह मसाप वि दा पिंगळे,राजन लाखे (प्रमुख कवी कट्टा) अँड जे.जे. कुलकर्णी सदस्य महामंडळ उज्वला मेहेंदळे कार्यवाह महामंडळ यांच्यासह उपस्थित सर्व साहित्यिकांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर उपस्थित होते

या महिला भगिनींनी केले पारंपारिक पद्धतीचे औक्षण

९७ वे मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होत असून या संमेलनामध्ये मराठी भाषेचे साहित्यिक राज्य भरातून आलेले आहेत. मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या साहित्यिकांचे पूर्वसंध्येला पुष्पा भामरे, छाया कोठावदे, मंगला ब्राह्मणकर, वनिता महिंद, शकुंतला येवले, उज्वला शिरोडे, रेखा मोराणकर, यांनी पारंपारिक पद्धतीने औक्षण केले.

कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील भामरे, जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जळगावचे उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे, अमळनेरचे तालुकाध्यक्ष संदीप काटे, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, विद्यार्थी सेनेचे राहुल शेलकर, संकेत पाटील, शैलेंद्र चौधरी, राहुल साळुंखे, मनोज रंधे, नितीकेश मोरे, संजय मोती, राकेश दाभोळे, आदित्य बोरकर, गजानन गोसावी, जळगाव शहराचे उपशहर अध्यक्ष सतीश सैंदाणे, यांच्यासह अमळनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या