Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeजळगावनाथाभाऊंच्या मुलाच्या मृत्यूवरून गिरीश महाजनांचा गंभीर दावा; खडसेंवर निशाणा

नाथाभाऊंच्या मुलाच्या मृत्यूवरून गिरीश महाजनांचा गंभीर दावा; खडसेंवर निशाणा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर थेट आरोप करत एक खळबळजनक दावा केला आहे.

प्रफुल्ल लोढा या भाजपमध्ये सामील झालेल्या व्यक्तीवर बलात्कार व हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचे जुने संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत खडसेंवर टीका करत अनेक गंभीर वक्तव्ये केली.

महाजन यांनी सांगितले की, खडसे यांचे आरोप निराधार असून त्यांच्यामागे केवळ राजकीय द्वेष आहे. ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांना आजपर्यंत सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. भाजपमध्ये पुन्हा येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण कुणीही त्यांना पक्षात घेतलं नाही.”याचवेळी नाथाभाऊंच्या मुलाच्या मृत्यूबाबत गिरीश महाजनांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी दावा केला की, “निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच प्रफुल्ल लोढाने एकनाथ खडसे यांच्यावर त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले होते. त्या वक्तव्यांचा विचार केला, तर खडसेंनी इतरांवर आरोप करण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेची चौकशी करायला हवी.” महाजनांनी खडसे आणि लोढा यांच्या जुन्या संबंधांचे फोटो देखील असल्याचे सांगून, “माझ्याकडे दोघांचे फोटो आहेत, हवे असल्यास दाखवू शकतो,” असा इशाराही दिला.

या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेगळं वळण मिळालं असून, पुढील काही दिवसांत या आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या