Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावशिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर ; मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे चार नगरपंचायतींची...

शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर ; मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे चार नगरपंचायतींची जबाबदारी..!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नोव्हेंबर २०२५ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणजेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज महत्त्वाच्या ‘निवडणूक प्रभारी पदांच्या’ नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. राज्यातील जवळपास ७० पेक्षा अधिक ठिकाणी निवडणूक प्रभारी नेमण्यात आले असून, या यादीत जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण चार नगरपरिषद/नगरपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मंत्री गुलाबराव पाटलांकडे चार नगरपरिषद/नगरपंचायतींची जबाबदारी…
शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या नियुक्त्यांनुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वरणगाव नगर परिषद, भुसावळ नगर परिषद, धरणगाव नगर परिषद, व नशिराबाद नगरपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीद्वारे मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाचा, अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा फायदा घेत, पक्षाची ताकद वाढविणे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करणे हा पक्षाचा उद्देश आहे.जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्यात या नियुक्तीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्तरावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिवसेना सूत्रांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील अन्य निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या...
शिवसेनेच्या या यादीत जळगाव जिल्ह्यातील इतर आमदारांनाही विविध नगरपरिषद व नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याकडे भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव नगरपरिषद तसेच शेंदुर्णी नगरपंचायत, आमदार चंद्रकांत सोनावणे- चोपडा, फैजपूर, यावल नगरपरिषद, आमदार अमोल पाटील – एरंडोल, पारोळा नगरपरिषद. आमदार चंद्रकांत पाटील – रावेर व सावदा नगरपरिषद तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत, माजी आमदार शिरीष चौधरी – अमळनेर नगरपरिषद.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…
या नव्या नियुक्त्यांनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि स्थानिक नेतृत्वामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविल्याने पक्षाची संघटनात्मक शक्ती आणखी मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ही नियुक्ती निर्णायक ठरणार असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या