जरांगेंनी बैठकांमधील माहिती उघड करावी – अजय महाराज बारसकर
मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह :- मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे.
मराठा आंदोलनाचा प्रश्न सरकारने जवळपास मार्गी लावला आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून मंजूर झाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आला. मराठा समाज विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मराठा आंदोलनात उभी फूट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी अनेकांची घर उद्धवस्त केली. जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा बरासकर यांनी केला आहे.
लोणावळा आणि वाशीत अधिका-यांसोबत गुप्त बैठका.
एकीकडे आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगेंचे सहकारी बरासकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे हेकेखोर माणूस आहे. रोज पलटी मारतात. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही. लोणावळा आणि वाशीत अधिका-यांसोबत गुप्त बैठका घेतल्या. जरांगे सरकारला निवेदन देत नाहीत असे गंभीर आरोप बारसकर यांनी केले आहेत.
जरांगेविरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत- अजय महाराज बारसकर …
उपोषणाचा श्रेयवादासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठा जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर जेसीबी फुले उधळणारे लोक आले कुठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी उपस्थित केले आहेत. जरांगेविरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. 10 फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरु करणार हे समाजाला सांगितले होते. उपोषणाला बसण्यापूर्वी मराठा बांधवांना जरांगेंनी विश्वासात घेतले होते.
जरांगेनी चार शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली असा आरोप..
जरांगेचे दादागिरी करणारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जरांगेनी चार शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली. जरांगेनी मराठ्यांची घरं उद्धवस्त केली. लक्ष कसं वेधून घेता येईल हे जरांगेला चांगलं माहित आहे. टीआरपी मिळवण्यासाठी मुद्दाम तो पत्रकारांसमोर लोकांची मीडियाची फसवणूक होईल अशा भाषेत बोलतो. जरांगेची भाषा शिवराळ आहे असे अनेक गंभीर आरोप बारसकर यांनी केले आहेत.