Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजरांगे पाटलांनी दुसरे उपोषण सोडले ; सरकारला दिला २ जानेवारीपर्यन्तचा वेळ..!

जरांगे पाटलांनी दुसरे उपोषण सोडले ; सरकारला दिला २ जानेवारीपर्यन्तचा वेळ..!

बीड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. आज त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे.

सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे.

मराठा आरक्षणाची मागणी लावून धरलेल्या जरांगे पाटील यांना सरकारचे शिष्टमंडळ आज भेटण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदिपान भुमरे यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी पर्यंतचा वेळ दिलेला आहे. दिवाळी गोड व्हावी अशी इच्छा व्यक्त करत जरांगे यांनी हे उपोषण मागे घेतो असे जाहीर केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या