जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागातर्फे मंगळवार रोजी डी.एन. सी. व्ही. पी. संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयात ‘संशोधनाकडे वळा’ या कार्यक्रमाचे पहिले व्याख्यान, एफ. वाय., एस .वाय. टी .वाय, बी. एससी .च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास साधारणता शंभर विद्यार्थी आणि १० प्राध्यापक हजर होते. वि प जळगाव विभागाचे सचिव प्रा. दिलीप भारंबे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच प्रस्तावना केली.या कार्यक्रमाकरिता आय. सी .टी. मुंबईचे संशोधक मनोज देव यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळा, व्यवसाय म्हणून स्वीकारा त्यातील संधी आणि त्यानंतर देशाचा फायदा, स्वतःचा फायदा ,समाजाचा फायदा ,याविषयी विविध उदाहरणे देऊन,सविस्तर विवेचन केले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, तसेच भौतिक शास्त्र प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र लोखंडे , उपप्राचार्य प्रा. प्रीती बोंडे.यांनी आणि त्यांच्या सर्व स्टाफने हजर राहून खूप सहकार्य केले