Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामाझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मी 17 नोव्हेंबर आधीच दिलाय : छगन भुजबळ

माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मी 17 नोव्हेंबर आधीच दिलाय : छगन भुजबळ

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको म्हणून शांत.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहीजे पण ते आमच्या ताटातील नको.

नगर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अंबड येथील ओबीसी रॅलीच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला असल्याचा गौप्यस्फोट आज मंत्री छगन भुजबळ यांनी केला. त्या मुळे मंत्रिपदावरून कोणीही टोमणे मारण्याचे काम नाही असा इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय.

आरक्षण द्या पण वेगळं द्या,आमच्या ताटातील देऊ नका,

आज नगर येथील ओबीसी मेळाव्यात बोलतांना राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना टार्गेट केले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, हातात कागद घेतला अन् म्हणाले अध्यादेश आला. लेकाला अध्यादेश आणि नोटिफिकेशनला मसुदा म्हणजे काय माहित नाही. आज चार दिवस झाले राज्यात उन्माद सुरु आहे. ओबीसी लोकांच्या घरासमोर शिविगाळ सुरु आहे.या मुळे वाद होण्याचा संभव आहे. मी आताही सांगतो मराठा समाजाला माझा विरोध नाही, त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहीजे असं म्हणणारे आम्ही आहोत. पण ते वेगळं द्या. आमच्या ताटातील देऊ नका, असे छगन भुजबळ म्हणाले.

मला कुणी लाथा मारून मंत्रीमंडळाच्या बाहेर काढेल, असे होऊ शकत नाही.

मंत्री छगन भुजबळांनी आपल्याला मंत्रीपदाचा मोह नाही. अंबड येथील पहिली ओबीसी रॅली होण्याच्या आधीच १७ नोव्हेंबर रोजी आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. यामुळे मला कुणी लाथा मारून मंत्रीमंडळाच्या बाहेर काढेल, असे होऊ शकत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या