जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह/विशेष प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार याची बदली झाल्याने त्यांचे जागी जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदली होऊन त्यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली झाल्याचे आदेश दिनांक ३१ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यांचे जागेवर शासकिय सहसचिव व्यंकटेश भट यांनी बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते त्या आदेशानुसार दि ४ फेब्रुवारी रोजी मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याकडून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार
स्वीकारला आहे.