भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : – येथील अनुष्का जितेंद्र पाटील हिने नीट (NEET-UG) 2025 परीक्षेत 568 गुण मिळवून 99.72 टक्केवारी (परसेंटाइल), AIR-5863 आणि OBC-2344 असा रँक प्राप्त केला आहे. तिने बारावी विज्ञान शाखेत 92 टक्के गुण मिळवले असून, मॅक्रोव्हिजन अकॅडमी रावेर शाळेत ती दुसऱ्या क्रमांकावर आली असून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
अनुष्काच्या या यशामध्ये शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे पाठबळ लाभले. ती महाजेनको, दीपनगर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे. पी. पाटील आणि कोथळी येथील आश्रमशाळेतील उच्च माध्यमिक शिक्षिका माधुरी पाटील यांची कन्या आहे.
तिच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि समाजातून अभिनंदन व्यक्त होत आहे