जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- किड्स झोन प्रि-स्कूल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे आजपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या मा. महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. लेझीम व ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीतून श्रींची मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. शाडू माती किंवा स्वहस्ते तयार केलेल्या शेतमातीच्या मूर्तींचाच स्वीकार करावा, ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
या वेळी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पाटील सर यांनी नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, निर्माल्य कलशाचा वापर करावा आणि उत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद श्री. ज्ञानचंद ब-हाटे सर, श्री. केतन ब-हाटे सर, श्री. संदीप खंडारे सर, श्री. विकास नेहेते सर, श्री. विजय चौधरी सर तसेच सौ. सरोज पाटील मॅडम आणि सौ. आशा चौधरी मॅडम यांनी परिश्रम घेतले.