जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लिटल चॅम्प्स प्रि-प्रायमरी स्कूल, जय दुर्गा प्राथमिक-माध्यमिक व कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शनिवारी दि.१६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषा साकारून आकर्षक गरबा नृत्य सादर केले. तसेच लहान मुलांनी मानवी थर लावून “गोविंदा आला रे आला” च्या घोषात दहीहंडी फोडत उत्सवाला रंगत आणली.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर कोल्हे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्याला पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला