Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईममेहुणबारे पोलिसांची दमदार कारवाई : मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड...आरोपी अटकेत ; दोन...

मेहुणबारे पोलिसांची दमदार कारवाई : मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड…आरोपी अटकेत ; दोन दुचाकी जप्त

मेहुणबारे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दिवसा झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत आरोपीस अटक करून दोन चोरीच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड येथून दिवसा दोन मोटरसायकल चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी गुन्ह्यातील तीन आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी दादू संजय सोनवणे (वय १९, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यास मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली एक व अन्य एक अशी एकूण दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत मोटरसायकल चोर असून त्याचे इतर दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कामगिरी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे, पोहेका मोहन सोनवणे, गोकूळ सोनवणे, पोना मिलिंद कुमावत, पोकों विनोद बेलदार, राकेश काळे व प्रशांत खैरे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या