Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याऔसा लातूर येथे मेरी माटी, मेरा देश अभियानांतर्गत कार्यक्रम;शहिदांना वंदन

औसा लातूर येथे मेरी माटी, मेरा देश अभियानांतर्गत कार्यक्रम;शहिदांना वंदन

लातूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- लातूर जिल्ह्यातील औसा येथे ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमांतर्गत शहीद वीरांना मानवंदना करून संकलित केलेली माती अमृत कलशमध्ये ठेवून त्या अमृत कलशाचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पंचप्राणाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश महामंत्री व युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील ,युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाचे महाराष्ट्राचे संयोजक राजेश पांडे यांच्या सूचनेनुसार माती संकलित करण्यात आली आहे. माती जमा करून राजधानी दिल्ली येथे शहीद वीरांच्या सन्मानार्थ आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘अमृत वाटिका’ची निर्मिती केली जाणार आहे.

यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ, मराठवाडा विभाग समन्वयक अरूण पाठक, मेरी माटी..मेरा देश ..मराठवाडा विभाग संयोजक ललित जाधव – जगताप,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष औसा ,सोनाली हाडोळे – पाटील भारतीय जनता आयटी सेल तसेच या कार्यक्रमाचे आयोजन औसा भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन अनसरवाडे. यांनी केलं होते .

यावेळी युवा मोर्चा टीम औसा , नितीन कवठाळे, धनराजजी परसने, नानेश्र्वर ईंजे, जयराज होगले, मुक्तेश्वर लवटे, विकास हातरगे, श्याम बिराजदार, ज्ञानेश्वर जाधव, विजय कदम,राज लोकरे, विशाल मुरंबे. अनिल शिंदे, काकासाहेब सुरवसे, ईश्वर घोटाळे भाजप युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या