लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇👇
जळगाव/तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– ‘मी आता नवीन चपलाजोडे घेतले आहेत”,मारायला कुठे येऊ गिरीशभाऊ फक्त सांगा ‘ असे आव्हान माजी मंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिले. ते जळगाव येथील ‘ मुक्ताई ‘ या बंगला येथे आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत बोलत होते.
”मला कार्डिआक अरेस्ट आल्याने हृदय बंद पडले होते. आई मुक्ताबाई च्या आशीर्वादाने मी वाचलो ,मला पुनर्जन्म मिळाला असेही खडसे यांनी सांगितले.मात्र मी या संकटातून बचावल्याचे पुरावे देत आहे. यामुळे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना जोडे मारण्यासाठी मी कुठे यावे ? हे सांगावे !” असे आव्हान आमदार एकनाथराव खडसे यांनी दिले.
जळगावचे गंभीर प्रश्न,कापूस ,दुष्काळी परिस्थिती यावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.खडसे यांनी भाष्य केले.कापसाला का भाव देत नाही ,आता कुठे गेले संकतमोचक असे सांगून जिल्ह्यात तीन मंत्री असताना जिल्ह्यात एकतरी कुठला नवीन प्रकल्प आणला का दाखवा ,मी शंभर प्रकल्पाचे काम पूर्ण केले असेही त्यांनी ठामपणे सांगितले.