Thursday, April 9, 2026
police dakshta logo
Homeक्राईम12 तासांत मोटरसायकल चोरीचा छडा; आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

12 तासांत मोटरसायकल चोरीचा छडा; आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनेचा अवघ्या 12 तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण सखाराम अहीरे (वय 38, रा. तांबापुरा, जळगाव) यांनी दिनांक 03 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9.00 वाजता आपली हिरोहोन्डा स्प्लेंडर (क्र. MH-28 G 3256) ही मोटरसायकल घरासमोर हॅन्डल लॉक करून उभी केली होती. मात्र, दिनांक 04 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजता उठून पाहिले असता सदर मोटरसायकल जागेवर आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 12 तासांत आरोपी साहील महोमद तडवी (वय 28, रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज घुले हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या