Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमएमआयडीसी हद्दीत बॅग लिफ्टिंग प्रकरण उघडकीस ; ८ लाखांची रोख रक्कम हस्तगत

एमआयडीसी हद्दीत बॅग लिफ्टिंग प्रकरण उघडकीस ; ८ लाखांची रोख रक्कम हस्तगत

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंगप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गुन्ह्यातील एक आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून ८,००,०००/- रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

फिर्यादी विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ८४१/२०२५, भा.दं.वि. कलम ३०९(४) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याच्या गांभीर्याची नोंद घेऊन पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची स्पष्ट सूचना दिली होती.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. समांतर तपास सुरू असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संशयित विजय शांताराम पाटील (वय ४१, रा. कलावसंत नगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने फिर्यादीच्या ताब्यातून हिसकावून नेलेली ८ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.आरोपीला पुढील तपासाकरिता एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पथकातील अधिकारी-अंमलदार पो.उ.नी बागल, सोपान गोरे, पो.हे.कां प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, पो.का. सिद्धेश्वर डापकर, रतनहरी मयूर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), तसेच नेत्रम व सायबर शाखेतील पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, गौरव पाटील व मिलींद जाधव यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या