Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावएमआयडीसी पोलिसांचे अनोळखी मयत पुरुष बाबतीत ओळखीचे आवाहन

एमआयडीसी पोलिसांचे अनोळखी मयत पुरुष बाबतीत ओळखीचे आवाहन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– दिनांक 23 ऑगस्ट रोजी सिंधी कॉलनी येथील नागरीकांनी एक अनोळखी पुरुष वय 40 वर्ष अंदाजे यास औषधोपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे दाखल केले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना दि. 29 ऑगस्ट रोजी हा अनोळखी पुरुष औषधोपचारा दरम्यान सिव्हील हॉस्पीटल मध्ये मयत झाला आहे. सदर अनोळखी इसमाबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यु क्र. 110/2023 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद दाखल आहे.

सदर अनोळखी इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे असून अंदाजे वय 40 वर्ष, रंग काळा, उंची 5.5 फुट, बांधा सडपातळ, अंगात एक फुल बाहीचा, पांढ- या रंगाचा, त्यावर काळया रंगाचे उभ्या लाईन असलेला शर्ट असे वर्णन आहे.तरी सदर इसमाबाबत कोणास काही माहीती मिळुन आल्यास एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे (0257-2210500) या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या