Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeक्राईमएम.आय.डी.सी. पोलिसांनी केले मोटारसायकल चोराला गजाआड

एम.आय.डी.सी. पोलिसांनी केले मोटारसायकल चोराला गजाआड

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि.1ऑगस्ट रोजी रात्री 9 ते 11 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांची मोटारसायकल (क्र. MH-19 BR-8538) ही डीएफसी बँक पाडे चौक येथे लावून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचा तपास सुरु असताना पोलिसांना माहिती मिळाली की चोरी केलेली मोटारसायकल ही रोहिणेश्वर कॉलनी, जळगाव येथे आरोपी अनिकेत उर्फ अनिकेत उर्फ रोशन कोळी याने ठेवली आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील, पो.ना. प्रदीप चौधरी व त्यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीस अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल (क्र. MH-19 BR-8538) जप्त करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक श्री. संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक श्री. बबन आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. प्रदीप चौधरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या