जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील MKCL तर्फे जळगाव जिल्हा पत्रकार संघ जळगाव साठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल या कार्यशाळे अंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेला जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर, जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त विजय पाटील, अशोक भाटिया, प्रा. देशमुख सर, महानगर अध्यक्ष विवेक खडसे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भिका चौधरी, MKCL जिल्हा समन्वयक उमाकांत बडगुजर, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
MKCL चे मार्गदर्शक विनायक कदम यांनी AI विषयी पत्रकारांसाठी उपयुक्त असे खूप छान टूल चे मार्गदर्शन केले.या कार्यशाळेमधील AI आधारित संकल्पना आणि प्रात्यक्षिके पाहून जिल्हा पत्रकार संघ यांना हा उपक्रम नवा आणि नाविन्यपूर्ण होते असे विशेष कौतुक केले. त्यांनी MKCL च्या कार्याचे मनापासून अभिनंदन करत कार्यालयीन कामकाजासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असे मत व्यक्त केले.