Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावमनसेचा दणका; अखेर अमळनेरातील दुकांनवरील फलक इंग्रजीतून झळकले मराठीत

मनसेचा दणका; अखेर अमळनेरातील दुकांनवरील फलक इंग्रजीतून झळकले मराठीत

मनसेच्या आंदोलनाला यश दुकानाची इंग्रजी पाटी बदलून केली मराठीत.

अमळनेर/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-  २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातर्फे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा अमळनेर शहरातील काही दुकानांच्या फलकावर इंग्रजी अक्षरात नाव असलेले फलक दिसत होते. त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर यांच्यामार्फत अमळनेर शहरातील दुकानांचे इंग्रजीमध्ये फलक लावण्याबाबत संबंधित दुकानदारांना २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेत फलक लावावे अन्यथा आपण सर्वोच्च न्यायालयाने आदेश पालन करत नाही असे समजून मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल अशी अमळनेर शहरातील दुकानांचे इंग्रजीमध्ये फलक लावलेल्या दुकानदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे तंबी देण्यात आली होती.  दुकानदारांनी याबाबत तत्काळ दखल घेत आपले दुकानाचे फलक मराठीत केले.

न्यायालयाचा  मान ठेऊन दुकानदारांनी मराठीत केलेला फलकाची पाहणी करून त्या दुकानदारांना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष हर्षल पाटील, आदित्य पगारे, विद्यार्थी सेनेचे राहुल शेलार, गट अध्यक्ष श्यामकांत बडगुजर, संदीप पाटील, योगेश पाटील, दिनेश पवार, प्रोमोद पाटील, आकाश पाटील, रुपेश पाटील व इतर मनसे सैनिकांनी भेट देत पाहणी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या