Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावकांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना विजेचा जबर धक्का...

कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना विजेचा जबर धक्का लागल्याने तळवेलच्या शेतकऱ्याच्या मृत्यू

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- – भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तरुण शेतकरी शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना त्याला विजेचा जबर धक्का बसला.त्यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. १९ रोजी घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तळवेल येथील निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय ४६) हे शेतात मंगळवारी पहाटे शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप सुरु करीत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात ते खाली जमिनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले.यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर तळवेल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या