Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईममोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेत धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून एक अट्टल चोरटा जेरबंद करण्यात आला. पारोळा पोलीस स्टेशन गु.र. नं. ३०७/२०२४ भादंवि कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी मनोज पाडुरंग गायकवाड (रा. लामकाणी, ता. जि. धुळे) हा चोरीच्या मोटार सायकलीसह फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात वाढलेल्या मोटार सायकल चोरीच्या प्रकरणांवर कठोर पावले उचलण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) राहुल गायकवाड यांनी पोउपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली पोह. विष्णु बिऱ्हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील व चालक दिपक चौधरी यांचे पथक तयार केले. पथक अनेक दिवसांपासून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर आरोपी मनोज गायकवाड हा आपल्या गावात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने लामकाणी गावातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पारोळा व जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ३ मोटार सायकली—एक होंडा शाईन व दोन युनिकॉर्न (काळ्या रंगाच्या) चोरी केल्याची कबुली दिली. सर्व तीन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी या कारवाईत मोलाचे योगदान दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या