Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावडॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन सन्मानित..

डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन सन्मानित..

जळगांव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगांव येथील संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन या संस्थेस महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार – २०२०-२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा-२०२४ या भव्य कार्यक्रम मुंबई येथे राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र,जमशेद भाभा सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,युवा कल्याण व क्रीडामंत्री बनसोडे, सुमंत भांगे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, ओमप्रकाश बकोरिया आयुक्त  समाज कल्याण महाराष्ट्र राज्य आदी उपस्थित होते. मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन, जळगांव या संस्थेने सन – २०२०-२१ या वर्षात केलेल्या सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केल्या बद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख व संस्थेचे खजिनदार हमीद तडवी यांचा सुमंत भांगे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, ओमप्रकाश बकोरिया आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार-२०२०-२१ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव नईम शेख,सह सचिव इम्रान शेख,उपाध्यक्ष सलीम इनामदार, सदस्य जगदीश सपकाळे, मसूद खान, नाजीम शेख, समाजभूषण पुरस्कार प्राप्त लक्ष्मण पाटील, वल्लभ चौधरी आदींनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या