मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त आणि अकार्यक्षम मंत्र्यांना “नारळ” देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या संभाव्य फेरबदलात शिंदे गटाचे सर्वाधिक मंत्री लक्ष वेधून घेत असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही काहींवर गच्छंतीची टांगती तलवार आहे.
प्रमुख मुद्दे:
शिंदे गटाचे संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम वादात.
राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ यांच्यावरही कारवाईची शक्यता.
भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी; मंत्रिपद सोडण्याची शक्यता.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद, मुनगंटीवारांना अध्यक्षपद?
वादग्रस्त मंत्र्यांची यादी:
शिवसेना (शिंदे गट)
संजय शिरसाट : व्हिडिओमध्ये सिगारेट ओढताना आणि पैशांनी भरलेली बॅग आढळल्याने वादात.
संजय राठोड : पूर्वीच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे पुन्हा लक्षात.
योगेश कदम : बारवर छापा, बारबालांच्या नृत्यामुळे गृहराज्यमंत्री अडचणीत.
संजय गायकवाड : विधिमंडळ कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण.
राष्ट्रवादी काँग्रेस
माणिकराव कोकाटे : रम्मी खेळतानाचा व्हिडिओ, वादग्रस्त विधानं.
नरहरी झिरवळ : निष्क्रियता आणि स्थानिक पातळीवरील नाराजी.
भारतीय जनता पक्ष (भाजप)
गिरीश महाजन : मंत्रिपद जाण्याची शक्यता, संघटनेत महत्त्वाची भूमिका मिळणार.
गोपीचंद पडळकर : गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला विधिमंडळात घेऊन गेल्याचा आरोप.
संभाव्य नव्या चेहऱ्यांचे समावेश:
राहुल नार्वेकर : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मंत्रीपदासाठी तयारी.
सुधीर मुनगंटीवार : विधानसभेचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता, सरकारविरोधी ठाम भूमिका.
वादग्रस्त मंत्र्यांमुळे स्थानिक निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणूनच फेरबदल शक्य..
महायुती सरकारमध्ये गेल्या सहा महिन्यांत अनेक मंत्री वादात सापडले आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये याचा फटका टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. “द न्यू इंडियन एक्स्प्रेस”ने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होऊ शकतो.