Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजिल्हाभरात "मुख्यमंत्री वयोश्री योजने"अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन..

जिल्हाभरात “मुख्यमंत्री वयोश्री योजने”अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन..

शिबिर दि.०१ मार्च २०२४ ते ०७ मार्च २०२४ या कालावधीत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे होणार.

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ् केंद्र इ.व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दि.०१ मार्च २०२४ ते ०७ मार्च २०२४ या कालावधीत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील आरोग्य विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेवून सूचना केल्या आहेत.

शिबिरात या प्रकाच्या केल्या जातील तपासण्या..

हे शिबिर सप्ताहात जेष्ठ नागरिकांसाठी श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. संबंधित आवश्यक तपासण्या होणार आहेत. या शिबीर सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे..

आधारकार्ड/मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी आपली नोंदणी करून आरोग्य तपासणी करून घ्यावी.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या