Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौऱ्यावर; दौऱ्याची तपशीलवार माहिती...!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौऱ्यावर; दौऱ्याची तपशीलवार माहिती…!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि.12 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्यांचा नियोजित दौरा व त्यांचे कार्यक्रम सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि. जळगावकडे प्रयाण.

दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम. एम. कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण.

दुपारी 12.30 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – एम. एम. कॉलेज मैदान पाचोरा)

दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण.

दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई- भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि. जळगाव),

दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण.

दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या