जळगाव/विशेष प्रतिनिधी:-राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे नुकतेच निधन झाले.या निमित्ताने सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील निवासस्थानी आज संध्याकाळी भेट घेतली. रेवाबाई पाटील यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पांजली वाहिली.मंत्री महोदयांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी मदतकार्य व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी विविध राजकीय पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.