Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeआरोग्यमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटींचे अर्थसहाय्य;...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटींचे अर्थसहाय्य; ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांवर उपचार

मुंबई/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटींचे अर्थसहाय्य वितरित करून ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. मुख्यमंत्री http://Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट मदत मिळत आहे. नागपूर व मुंबई कार्यालयांमधून तब्बल ३२१ कोटींची मदत दिली गेली आहे. या निधीमुळे अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस,अवयव प्रत्यारोपण, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदी दुर्धर आजारांवरील उपचारांना मदत मिळते. सहायता कक्षाच्या ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर अर्ज उपलब्ध करुन दिला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या