Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeक्राईममुक्ताईनगर: 10 लाख 19 हजारांची अवैध गुटखा वाहतूक ; मुद्देमाल, वाहन जप्त...

मुक्ताईनगर: 10 लाख 19 हजारांची अवैध गुटखा वाहतूक ; मुद्देमाल, वाहन जप्त : एकास अटक

जळगाव | प्रतिनिधी ` पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्रीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती काढून कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा (क्र. MH-46-81065) या वाहनातून मुक्ताईनगरमार्गे बऱ्हाणपूर (म.प्र.) ते छत्रपती संभाजीनगर या दिशेने मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पथक पुरनाड फाटा येथे सापळा रचून थांबले असता सदर संशयित वाहन भरधाव वेगात येताना दिसले. पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन खामखेडा गावाकडे पळवून घेऊ लागला. पथकाने पाठलाग करून एर्टिगा वाहन थांबवून चालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अरबाज नौशाद बेग (वय ३०, रा. काझी हाऊस, खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून सुमारे १० लाख १९ हजार २० रुपयांचा रजनीगंधा सुगंधीत पानमसाला, करमचंद प्रीमियम पानमसाला, मिराज तंबाखू, विमल पानमसाला, पानपराग पानमसाला, जाफराणी जर्दा, मोबाईल फोन तसेच वाहतूक करणारे वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे (मुक्ताईनगर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक जयेश पाटील, पोउनि. निलेश गोसावी, पोहेकॉ. विजय पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र चौधरी, सलीम तडवी, छगन तायडे, रतनहरी गीते, हेमंत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच पो.अं. गोविंद सुरवाडे व गोविंद पवार (मुक्ताईनगर पोलीस स्टेशन) यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या