Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeजळगावमुक्ताईनगरच्या खडसे महाविद्यालयात अग्निवीर सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण.

मुक्ताईनगरच्या खडसे महाविद्यालयात अग्निवीर सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण.

मुक्ताईनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- कवयित्री कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरचे विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सहादिवशीय अग्निवीर सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण अभियान मोठ्या उत्साहात झाले .या अभियानात 40 विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला होता. मैदान मैदानावरील सत्र व बौद्धिक सत्र अशा दोन सत्रात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले .यात मैदानावरील सत्रात मा. मनोज चौधरी ( एन .सी.सी अधिकारी )यांनी या सहा दिवसात फिजिकल फिटनेस साठीचे विविध व्यायाम व परेड संबंधीची माहिती प्रात्यक्षिकासह दाखवून सराव करून घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसले.

बौद्धिक सत्रात दिनांक 21 मार्च रोजी शुभम कांडेलकर यांनी मूलभूत गणित ,22 मार्च रोजी मंगेश निळे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, 23 मार्च रोजी अनंता भागवत यांनी बुद्धिमत्ता ,24 मार्च रोजी योगिता झांबरे यांनी वैदिक गणित, 25 मार्च रोजी राहुल सोनवणे यांनी संभाषण कौशल्य, तर 26 मार्च 2024 रोजी दीपक बावस्कर यांनी मराठी व्याकरण
अशाप्रकारे विविध विषयाच्या तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले होते .

हे अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण अभियान हा कार्यक्रम कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.एच. ए. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ .संजीव साळवे व महिला अधिकारी डॉ.प्रतिभा ढाके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवती सभा सदस्य प्रा.सविता जावळे प्रा.डॉ. सुरेखा चाटे ,प्रा. डॉ. ताहिरा मीर ,प्रा.सीमा राणे व कमवा शिकवा योजनेतील विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या