Tuesday, March 17, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यमुकुंदभाऊ रोटे यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद येथे मोफत महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिर

मुकुंदभाऊ रोटे यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद येथे मोफत महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिर

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुकुंदभाऊ रोटे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे मोफत महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवरील तपासणी, मार्गदर्शन तसेच शस्त्रक्रिया सेवा रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या शिबिरात मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे यांसह विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.याशिवाय हर्निया, अपेंडिक्स, आतड्यांतील अडथळे, आतड्यांतील पीळ, पाइल्स, फिशर, डायबेटिक फूट, थायरॉईड, हायड्रोसिल, विविध प्रकारच्या गाठी आदी आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

शिबिरात नाक-कान-घसा विभागात कानाचा पडदा, टॉन्सिल तसेच नाकाच्या हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. नेत्रालय विभागात मोतीबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया, तर स्त्रीरोग विभागात गर्भाशयातील ट्यूमर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भपिशवीच्या गाठी व अंडाशयातील गाठी यासंबंधित उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.तसेच अस्थिरोग विभागात सांधे दुखी, सांधे मार, फ्रॅक्चर, कंबरदुखी, संधिवात, हाडे ठिसूळ होणे, हाडांची झीज, अपघातातील व्यंग तसेच स्नायू वेदना यांसारख्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.

त्वचारोग विभागात मुरूम व त्यानंतरचे व्रण/डाग, खाज, खरुज, इसब, जखमा, नायटा, अॅलर्जी, केस गळणे तसेच त्वचेचे विविध विकार, डोळ्यांतील व नखांतील विकार आणि काही लैंगिक समस्यांवर उपचार व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
याचबरोबर हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर अंतर्गत 2D Echo, ECG, कार्डिओग्राफ व रक्तदाब तपासणी मोफत केली जाणार असून गरजूंना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, रिंग अँजिओप्लास्टी, आय.व्ही.सी. फिल्टर व बायपास शस्त्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन व पुढील उपचार सुविधा दिल्या जाणार आहेत.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन) यांच्या हस्ते होणार असून विशेष प्रमुख अतिथी म्हणून जयप्रकाश बाविस्कर (नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अध्यक्ष, मातोश्री प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रबोधन संस्था) उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुकुंदभाऊ रोटे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.शिबिर बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नशिराबाद येथील मनसे कार्यालय, विकी सोसायटी कॉम्प्लेक्स, आठवडे बाजार, खालची आळी येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी येताना रुग्णांनी रेशनकार्ड व आधारकार्डची प्रत (ओरिजनल) सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आशिष भिरुड (९३७३३५०००९), रत्नेश्वर जैन (७०३०५७११११) तसेच लक्ष्मण पाटील (९३२६१५०००६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या