जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- शासनाची मुलींना उच्च शिक्षण मोफत योजना असताना… काही महाविद्यालय दिशाभूल करत आहेत असा आरोप काही विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
दिनांक 8 जुलै 2024 व 19 जुलै 2024 शासन निर्णयाचा विचार करता मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
शंभर टक्के लाभ देणे अपेक्षित होते ,मात्र जळगाव शहरातील नामांकित असलेल्या आय.एम. आरः महाविद्यालयातील
मुलींना सदर योजनेचा लाभ न देता मुलींना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत.यामुळे मुलींमध्ये संभ्रम तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पर्यायाने मोफत शिक्षणापासून त्या मुली वंचित राहिल्या.
सदरहू महाविद्यालयातील मुलींचे पालक आणि स्वतः विद्यार्थिनींनी भाजपा बुद्धीजीवी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे तक्रार केली असता त्या सर्वांना घेऊन शिक्षण सह- संचालक उच्च शिक्षण जळगाव विभाग जळगाव यांचे कार्यालय गाठले. त्यांच्याकडे तक्रार मांडली असता तक्रार ऐकून घेण्यासाठी प्रशासन अधिकारी यांची अतिशय उदासीनता दिसून आली. आमच्या अधिनस्त असलेल्या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देतो असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात गेल्यावर्षी तक्रार करून सुद्धा संबंधित कार्यालयाने त्या महाविद्यालयावर कारवाई न केल्यामुळे मागील वर्षीं ( 24-25 ) मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळाला नाही. यास जबाबदार कोण .?
या वर्षीं सुद्धा मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू असून लाभ मिळू दिला जात नाही अशी स्थिती आहे.जेव्हा की, इतर काही
महाविद्यालयातील मुलींना मोफत योजनेत प्रवेश मिळत आहेत. याच महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मागील वर्षाचा निकाल सुद्धा दिला गेलेला नाही.. पुढील परीक्षेचे हॉल ( परीक्षा प्रवेश पत्र ) ,तिकीट फी भरल्याशिवाय मिळणार नाही ,असं एप्रिल 2025 वेळेस सांगून मुलींना धमकावण्यात आले . कॉलेज शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी योग्य ती मदत करत नाही, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना शिष्यवृत्ती आतापर्यंत मिळालेली नाही. ओपन कॅटेगरी (खुला प्रवर्ग)च्या विद्यार्थिनींना आठ लाखाच्या आत उत्पन्न असताना सुद्धा या योजनेचा फायदा ते देत नाहीये.
विशेष की, या मुलींच्या एॅडमिशन कॅपने म्हणजे कॉलेजने घेतलेले एंट्न्स ने झालेले आहेत. योजनेचा लाभ न देता ही भूमिका महाविद्यालय कशी घेऊ शकते..? योजनेचा लाभ न देता मुलींना वेठीस धरून 10 जुलैच्या आत उरलेली भी भरा.. अन्यथा पुढील कारवाईस तयार रहा,अशाप्रकारे मुलींवर अन्याय होत असेल तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल. शासन देते आणि आपण देत नाही, ही शासनाची फसवणूक आहे.
खरंतर प्रत्येक कॉलेजमध्ये मोफत योजनेसाठी माहिती देण्यासाठी स्वतंत्रकक्ष देखील असला पाहिजे. मुलींनी वेळोवेळी तक्रारी केल्यात, पण महाविद्यालय त्यांची तक्रारच घेत नाही आणि भविष्यातील नुकसानीच्या भितीमुळे मुली लेखी तक्रारीस धजावत नाहीत असेही भाजपा बुद्धीजीवी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी विद्यार्थिनींच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे..