Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावपोलिसांचा वचक संपला...! तोंडावर ॲसीड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग..

पोलिसांचा वचक संपला…! तोंडावर ॲसीड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग..

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र असून याबद्दल जणमाणसात नाराजीचा सूर आहे.जामनेर तालक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अंगावर ॲसीड फेकून देण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या काही दिवसांपासून हुसेन शहा नाशिर सहा हा तिचा पाठलाग करत आहे. दरम्यान, २८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर च्या कालावधीपासून हुसेन हा पीडित मुलीचा पाठलाग करत होता. एवढेच नाही तर तिचा पाठलाग करून रस्त्यावर थांबवून “माझ्याशी निकाह कर, तू मला बाजारात भेटत जा, तू जर नाही भेटली तर तोंडावर ॲसीड मारेल, तू जर माझी झाली नाही तर तुला दुसऱ्याचीही होवू देणार नाही” अशी धमकी देत तिचा विनयभंग केला.

हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हुसेन शहा नाशिर शहा याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या