Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावमुलीशी बोलण्याच्या कारणाने तरुण ट्रक चालकाचा निर्घुण खून...!

मुलीशी बोलण्याच्या कारणाने तरुण ट्रक चालकाचा निर्घुण खून…!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात तरुण ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह विदर्भ रोडलाईन्स कंपनीत गुरांचा बाजार जवळ आढळला होता. या प्रकरणी मयत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीशी बोलतो याचा राग मनात ठेऊन बापानेच तरुणाला ठार मारीत संपवल्याची घटना फिर्यादीतून उघड झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दुपारी सागर रमेश पालवे (वय २५) रा. मालदाभाडी ता.जामनेर मयत तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. मयत तरुण हा विदर्भ रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट कंपनीत गेल्या २ वर्षापासून कामाला होता. मयत सागरच्या आई नीलम रमेश पालवे (वय ५५,) रा. मालदाभाडी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

दि.7 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री 9:30 वा. मयत सागरने त्याच्या आईला फोन करून सांगितले की, त्याच्यासोबत काम करणारे निलेश गुळवे व पिंटू महाजन हे आराम कक्षामध्ये मला काठ्यांनी मारहाण करीत आहेत. तेव्हा आईने तुझा मालक विकास लगडे याला फोन करून सांग असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सागरच्या आईने फोन केला असता त्याच्यासोबतचा चालक निलेश यांने फोन उचलला आणि सांगितले की, सागर झोपलेला आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक विकास लगडे यांनी सागरच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलाला उलट्या होत आहे. लवकर जळगावला या. त्यानुसार फिर्यादी या नातेवाईकासोबत जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्या. तेथे त्यांना त्यांचा मुलगा मयत झाल्याचे समजले.

फिर्यादी नीलम पालवे यांना विकास लगडे यांच्याकडून समजले की, संशयित आरोपी पिंटू महाजन व निलेश गुळवे यांनी पिंटू महाजन यांच्या मुलीसोबत सागर का बोलतो याचा राग त्यांच्या मनात होता. त्या रागातून त्यांनी कंपनीच्या कार्यालयात लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्यास जीवे ठार मारले आहे. त्यावरून मयत सागर पालवे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आदींनी भेट दिली. दरम्यान संशयीतांना ताब्यात घेण्याचे काम सुरू असून तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या