नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक (१० अ) मधून उमेदवारी दाखल केलेल्या भारताबाई विकास धनगर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस भरघोस गती मिळत आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र स्पष्टपणे उमटत असून प्रभागभर त्यांची चर्चा रंगत आहे.राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष विकास धनगर यांच्या कार्याचा ठसा आणि अनुभवाचा वारसा भारताबाई धनगर यांच्या उमेदवारीला बळकटी देत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील समस्यांना भिडून सुटसुटीत उपाययोजना मतदारांसमोर मांडल्या आहेत.
स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका…
प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची कमतरता तसेच मूलभूत सुविधांची उणीव या मुद्यांवर भारताबाई धनगर यांनी स्पष्ट धोरण मांडले आहे. नागरिकांच्या अडचणींचा वेध घेत त्यांनी प्राधान्यक्रम ठरवत तातडीने कामे हाती घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या संवादशैलीतून प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेचा सूर जाणवतो, अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.
भारताबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन…
प्रभाग १० मध्ये भारताबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली रॅली अभूतपूर्व ठरली. महिलांपासून युवकांपर्यंत, व्यावसायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारोंच्या संख्येत नागरिकांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा नोंदवला. रॅलीचा उत्साह, शिस्तबद्धता आणि नागरिकांची स्वप्रेरणेने झालेली उपस्थिती यामुळे संपूर्ण प्रभागाचे लक्ष या शक्तीप्रदर्शनाकडे वेधले गेले.रॅलीदरम्यान उमटलेला जनसमुदाय पाहता, विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घराघरातून मिळणाऱ्या प्रतिसादावरून ‘प्रभाग १० मध्ये भारताबाई धनगर विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत’, असे चित्र स्पष्टपणे उमोरत आहे.
मतदारांमध्ये भारताबाई धनगर यांच्या बाजूने सकारात्मक लाट…
गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील सर्वच पातळ्यांवर भारताबाई धनगर यांच्या बाजूने सकारात्मक लाट जाणवत आहे. जनसंपर्कादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचा आत्मीय संबंध आणि विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित केलेला प्रचार यामुळे त्यांची उमेदवारी अधिक भक्कम होत आहे.प्रभाग १० च्या भविष्यकालीन विकासासाठी सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची गरज असल्याचे मतदार मोठ्या प्रमाणावर पुढे करत असून त्या भूमिकेसाठी भारताबाई धनगर योग्य पर्याय असल्याची चर्चाही जोर धरत आहे.

