Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावयावलचे तहसीलदार व सहकाऱ्यांनी अंजाळेजवळ नदीकाठी साठवलेली वाळू केली जप्त

यावलचे तहसीलदार व सहकाऱ्यांनी अंजाळेजवळ नदीकाठी साठवलेली वाळू केली जप्त

यावल/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- यावल तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीच्या काठी विविध ठिकाणी ठिकाणी अवैद्यरित्या साठवण करून ठेवण्यात आलेला सुमारे १०० ब्रासहून अधिकचा गौण खनिजचा साठा जप्त करण्यात आला आहे .

बेवारसरित्या चोरीच्या उद्देशाने साठवण करून ठेवलेला दगड गोटे आणि डबरचा हा साठा तहसीलदारांच्या पथकाने हस्तगत केला आहे. तेव्हा या डबरच्या साठ्याचा प्रशासकीय पातळीवरील कारवाई पूर्ण करून लिलाव देखील केला जाणार आहे. तर या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन आणि साठा करणाऱ्यांमध्ये खळबड उडाली आहे.

अंजाळे ता. यावल या गावाजवळील तापी नदीच्या काठी गट क्रमांक ५८८, गट क्रमांक ५६४/१ आणि ५५२ मध्ये अवैद्यरित्या दगड गोटे डबर अर्थात गौण खनिज अवैद्यपणे साठवून ठेवले होते. या बाबतची गोपनीय माहिती तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी या ठिकाणी जावून छापा टाकला असता तेथे सुमारे १०० ब्रास होऊन अधिकचा अवैद्य गौणखनिजचा साठा मिळून आला. तेव्हा सदरील गौणखनिज साठा बेवारस म्हणून जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी सचिन जगताप, मीना तडवी, बबीता चौधरी, तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी, टी.सी. बारेला, तेजस पाटील, अरविंद बोरसे या पथकाने केली. आता प्रशासकीय पातळीवरील कारवाई पूर्ण करून या संपूर्ण अवैद्य गौण खनिज साठ्याचा लिलाव प्रशासनाच्यावतीने केला जाणार आहे. तेव्हा तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे यावल तालुक्यात अवैद्य गौण खनिज उत्खनन आणि साठवण करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या