Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeआरोग्यनगरच्या फळविक्रेत्याने ५ वर्षांपूर्वी सुरू केला उपक्रम ९ राज्यांत ४० हजारांवर मोफत...

नगरच्या फळविक्रेत्याने ५ वर्षांपूर्वी सुरू केला उपक्रम ९ राज्यांत ४० हजारांवर मोफत रक्तदात्यांचे जाळे; फोन करताच पोहोचतो रुग्णाजवळ दाता…!

अहमदनगर/ कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-वेळेवर रक्त न मिळाल्याने जिवलग मित्राच्या बहिणीचा मृत्यू झाला. याची सल इतकी बोचली की, अहमदनगर शहरातील एका २७ वर्षीय फळविक्रेत्या तरुणाने यापुढे रक्ताअभावी कुणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून निस्वार्थीपणे काम सुरू केले. गेल्या पाच वर्षांत याच्या प्रयत्नातून देशभरात ४० हजारांवर रक्तदाते तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठे जाळे तयार केले हे विशेष…! देशातील नऊ राज्यातून कुठूनही रक्ताची मागणी झाली की, रक्तदाते थेट गरजूपर्यंत पोहोचतात आणि मोफत रक्तदान करतात.

किशोर म्हातारदेव डमाळे (२७) हा तरुण अहमदनगर शहरात पाईपलाइन रोड या भागात फळविक्री करतो. रक्तदानासाठी त्याने अक्षरशः वाहून घेतले आहे. रक्तदानाची ही मोहीम २०१८ पासून झाली. किशोर डमाळे याला व्यापक रूप आल्यावर २०२० मध्ये त्याने रक्तवीर सामाजिक संघटना स्थापन केली. तीन वर्षांपूर्वी कराड (जि.सांगली) येथे एबी निगेटिव्ह ग्रुपचे रक्त मिळत नव्हते. ही माहिती रक्तवीर संघटनेला समजली तेव्हा बारामतीच्या सदस्याने बसने कराड गाठून रक्तदान केले. संघटनेच्या चांगल्या कामाची दखल घेत ‘बॉम्बे ब्लड ग्रुप असोसिएशन इंडिया’च्या वतीने २०२० मध्ये विक्रम यादव यांनी संघटनेला पुरस्काराने गौरवले. दरम्यान, ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे जिल्ह्यातील अवघे दोन रक्तदाते रक्तवीर संघटनेचे सदस्य आहेत.

रक्तविर संघटनेचे पदाधिकारी व विक्रमी रक्तदाते, रक्तदान कार्यासाठी वाहून घेणारे,अहमदनगर शहरातील कार्यशील युवक किशोर डमाळे यांचा बॉम्बे ब्लड ग्रुप संघटनेतर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अहमदनगर येथील ॲड. महेश एन.ढाके यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य, करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या