Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानागपूरात ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन

नागपूरात ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन

नागपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने 11 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर’ छायाचित्र व चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात भरवले जाणार असून दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहील. उद्घाटन समारंभ 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

रायपूर (छत्तीसगड) येथे संस्कार भारतीच्या सहकार्याने नुकतीच आयोजित स्मृती चित्रकला कार्यशाळेत साकारलेल्या 51 चित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. या कलाकृतींतून अहिल्याबाई होळकर यांच्या प्रशासनिक कार्यकौशल्यापासून त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि न्यायनिष्ठ योगदानापर्यंत विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

याशिवाय, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान घेतलेल्या रांगोळी कार्यशाळेत तयार केलेल्या रांगोळ्याही या काळात पाहता येणार आहेत.नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा दृश्यात्मक प्रवास अनुभवावा, असे आवाहन केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या